Description
“चला खेळूया” या गोष्टीसंग्रहात जगातील सर्व मुलांना आपले निरागस बालपण पहायला मिळेल. नितु, मिनी, रोहन आणि चिंटू हे चार बालमित्र रोज एकत्र खेळतात. खेळताना त्यांना अनेक वेगवेगळे अनुभव येतात. त्यातले काही गमतीदार, काही रोमांचक, तर काही ह्रिदयस्पर्शी असतात. या सगळ्या प्रसंगांमध्ये त्यांची निरागसता आपले मन मोहून टाकते. गोष्टी वाचताना वाहकाला आपणही त्यांच्यासोबत खेळत असल्याचा अनुभव होतो हे विशेष. लहान-मोठे सगळे या गोष्टींचा आनंद घेऊ शकतात.
प्रेरणा वाकडे, मूळच्या मुंबईकर, सध्या बंगलोर ला स्थायिक झालेल्या, एक यशस्वी बँक प्रबंधक म्हणून त्यांची ओळख. परंतु आपली लेखनाची आवड जोपासण्यासाठी, २७ वर्षानंतर बँकेतून सेवानिवृत्ती घेतली. इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेवर त्यांचे प्रचंड प्रेम. म्हणून दोन्ही भाषेत त्या गोष्टी लिहितात. याशिवाय कविता लिहिणे, गाणे, चित्रकला, या सगळ्या गोष्टींचीही त्यांना तितकीच आवड आहे. त्यांच्या गोष्टी मुलांना आवडतील अश्या गमतीदार आणि त्यांना समजतील अशा सरळ सोप्या भाषेत लिहिल्या आहेत. या गोष्टी लहान- मोठ्या सर्वाना तितक्याच मोरंजक वाटतील.
Reviews
There are no reviews yet.